१९ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा… -मा आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी फोटोग्राफर बांधवांना मार्गदर्शन लाभले

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)राजवड येथील निसर्गरम्य वातावरणातील शबरी फार्म हाऊसवर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने जागतिक छायाचित्र दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी.लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील हे अध्यक्ष स्थानी होते.यादोघांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.त्यावेळी जेष्ठ फोटोग्राफर भगवान पाटील, भगवान वारूडे,मुख्तार आली सय्यद,भास्कर पाटील या मान्यवरांच्या हस्ते देखील कॅमेरा पूजन करण्यात आले.
तसेच यावेळी कोरोना काळात फोटोग्राफी व्यवसायातील ज्येष्ठ फोटोग्राफर कै.सोमनाथ ढोमन पाटील व कै.राजनाथ जयदेव पाटील यांचे निधन झाले होते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी फोटोग्राफर बांधवांना बहुमुल्य मार्गदर्शन केले व संघटित रहा असा सल्ला दिला व पुढच्या वर्षी परत याठिकाणी येण्याचे आमंत्रण दिले. फोटोग्राफर बंधूंनी आपली मते व्यक्त केली.व संघटित का व्हावे.संघटनेचे महत्त्व विशद करण्यात आले.शिवाय यावेळेचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना असल्याने फोटोग्राफर बांधव आपल्या परिवारासह कुठले कार्यक्रमास एकत्र आले नव्हते त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात एक दिवस आपल्या परिवारासह सर्व फोटोग्राफर बांधवा घालवता यावा यासाठी असोसिएशन ने परिवारासह स्नेहभोजन कार्यक्रम
राजवड येथील निसर्गरम्य वातावरणातील शबरी फार्म हाऊसवर आयोजीत केला होता.जवळजवळ दीडशे फोटोग्राफर एकत्र येऊन जागतिक फोटोग्राफर दिन वनभोजन करून साजरा करण्यात आला यावेळी अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व सन्मानिय सदस्य हजर होते.
या कार्यक्रमाचे अजून एक विषय वैशिष्ट्य म्हणजे काल दहीहंडी असल्याने त्यावर आधारित दहीहंडी थीम तयार करून यश या चिमुकल्या श्रीकृष्ण बनलेल्या बाळाच्या हातून दहीहंडी फोडण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम