आंतरवाली सराटीतील दगडफेक प्रकरणात चौघांना अटक
बातमीदार | २५ नोव्हेबर २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात उपोषण सुरु होते. या दरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. या प्रकरणात पोलिस आणि स्थानिक आंदोलक यांनी एकमेकावंर आरोप प्रत्यारोप केले होते. आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यातील मुख्य आरोपी ऋषीकेश बेदरेसह त्याच्या 3 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्ररकणात ऋषीकेश बेदरे या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही अटक केली. काल सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास ही अटक करण्यात आली. मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर हे प्रकरण तापले होते. याचवेळी पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी ऋषीकेशकडून पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त केली आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम