रोटरी गोल्डसिटीतर्फे मोफत लसीकरण; बळीराजाच्या पशुधनाच्या मदतीसाठी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 19 सप्टेंबर 2022 | जळगाव लम्पी रोगामुळे बळीराजाकडे असलेले गाय-बैल या पशुधनाचे जीवन धोक्यात आल्यामुळे रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीने एरंडोल व दोणगाव येथे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने मोफत प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन केले.

एरंडोल येथे दत्त मंदिराजवळील सुरज काबरा यांच्या गोठ्यात पशुचिकित्सक डॉ. अशोक महाजन यांनी तर दोणगाव येथे डॉ. गौरव सुर्यवंशी व डॉ. रवी गुजर यांनी गायींना लस टोचून सुरुवात केली.
यावेळी एरंडोलच्या तहसीलदार सुचिता चव्हाण, रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष सुनील आडवाणी, मानद सचिव निखील चौधरी, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. दीपक अटल, पंकज काबरा, प्रिती मंडोरा, मितेश पलोड, सोनल काबरा आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्लॅन्टो कृषी तंत्र अर्थात प्रलशर बायो प्रॉडक्टस प्रा.लि.चे संचालक व रोटरी गोल्डसिटीचे सचिव निखील चौधरी यांच्या कंपनीने 15 हजार लसींच्या डोससाठी आर्थिक सहकार्य केले. तर मितेश पलोड यांनी सवलतीत या लस उपलब्ध करुन दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या संकटकाळी थेट गोठ्यात येऊन प्रशासनाच्या हातात हात घालून रोटरी जळगाव गोल्डसिटीने सामाजिक बांधलकीची भावना जोपासली असे तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात अध्यक्ष सुनील आडवाणी यांनी भूमिका मांडली. आभार डॉ. दीपक अटल यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम