
दै. बातमीदार | 19 सप्टेंबर 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईट तर्फे कजगाव मधील 100 शेतकरी बांधवांना सुरक्षेच्या दृष्टीने चष्मे, मास्क, ग्लोज आदि किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती एकनाथ महाजन, भागवत महाजन, सुनील महाजन, विजय खानकारी, गोल्डसिटीचे अध्यक्ष डॉ. पंकज शाह, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. वैजयंती पाध्ये, प्रकल्प प्रमुख नितीन इंगळे, अजित महाजन, संदीप असोदेकर, सचिन चौधरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष डॉ. पंकज शाह यांनी शेतकरी बांधवांना शेतात फवारणी करतांना डोळ्यांची घ्यावयाची काळजी व प्रथमोपचार या विषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमास विवेकानंद नेत्रालय आणि फेको सेंटर यांचे सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम