अजित पवारांच्या आदेशानुसार खासदार आप्पा बारणे यांना पूर्ण सहकार्य – गणेश खांडगे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा. श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावून लढण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे मावळ तालुक्यातील कार्यकर्ते जोरात तयारीला लागले आहेत, सदर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.

 

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांची तळेगाव दाभाडे येथे सदिच्छा भेट घेतली असता आप्पा बारणे यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे, मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना मोरे आधी पदाधिकारी उपस्तीत होते.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप कारके, पवन मावळो अध्यक्ष भरत भोते, आंदर मावळ अध्यक्ष रूपेश घोजगे, खरेदी विकी संघाचे सभापती शिवाजी असवले,प्रदेश चिटणीस विक्रम कदम, प्रवक्ते राज खांडभोर, उपाध्यक्ष प्रशांत भागवत,‌सरचिटणीस सुहास गरूड, केशव कुल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे जोरदार स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आप्पा बारणे व खांडगे यांच्यात चर्चा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास श्रीरंग आप्पा बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम