भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

पिंपळे गुरव येथील निवासस्थानी कार्यकर्ते, मित्रमंडळींच्या लक्षणीय गर्दीने उत्सवाचे वातावरण; शहरभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | भल्या पहाटेपासूनच शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची मोठी गर्दी होवून, त्यांच्या घरी उभारलेल्या मोठ्या पंडालच्या उपस्थितीने पक्षाची एकजूट आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा, त्यांना असणारी नागरिकांची साथ मोठ्या प्रमाणात सामोरे दिसून आली. शंकर जगताप यांना हितचिंतक मिळाल्याने, शुभेच्छांची देवाणघेवाण आणि एकजुटीचे प्रदर्शन यामुळे कार्यक्रमाच्या उत्साहात भर पडली.

 

पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांचा दि.०५ एप्रिल रोजी वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगामुळे त्यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींच्या लक्षणीय गर्दीने त्याठिकाणी उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शहरातील ६ ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांना मोफत “स्वातंत्र वीर सावरकर” हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच, त्या – त्या ठिकाणी पदाधिकारी – पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

 

स्व. लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे नेत असताना, समाजात वेळोवेळी सामाजिक कार्य शंकर जगताप यांच्या हातून घडत आहेत. महाआरोग्य शिबिर, दिव्यांगांना मदत, महिलांचे बचत गटाद्वारे मदत, तसेच, शालेय विद्यार्थी साहित्य वाटप, अशा विविध सामाजिक कार्यातून शंकर जगताप नेहमीच जनसामान्यात त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहतात.

 

आनंदी उत्सवाने कौटुंबिक बंधांचे महत्त्व जपणारे शंकर जगताप यांच्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक आजच्या या वाढदिवसाच्या निमीत्ताने शहरवासियांनी अनुभवले. सदर प्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार आश्विनीताई जगताप, आमदार उमा खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शितल शिंदे, शैला मोळक, प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी ‍विधानसभा प्रमुख अमित गोरखे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, यांच्यासह राज्यपातळीवरील पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी, त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय मंडळी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शुभेच्छा दिल्या.

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम