गद्दार दिन साजरा केलाच पाहिजे ; शिंदे गटाच्या मंत्र्याचा पाठींबा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  राज्यातील ठाकरे गट व विरोधक सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यापार्श्वभूमीवर खोके दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी शिंदे गटाला निषेध करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाठिंबा दिला आहे.

ठाकरे गद्दार दिवस साजरा केलाच पाहिजे. कारण बाळासाहेबांच्या विचाराशी त्यांनी गद्दारी केली आहे. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर त्यांनी लोळण घेतलं आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांनी गद्दार दिवस साजरा करावा. स्वत: साठी त्यांनी हा दिवस साजरा केलाच पाहिजे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे बोलले होते की, मला एक दिवस पंतप्रधान करा. मी 370 कलम रद्द करतो. मी राम मंदिर बांधून दाखवतो. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आहे. बाळासाहेबाांबद्दल मोदींना किती आदर आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, असंही केसरकर म्हणालेत.

बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, 80 टक्के समाजकारण 20% राजकारण. ठाकरे गट हे सगळं विसरला आहे. ते शंभर टक्के फक्त राजकारण करत आहेत. 100% राजकारण करणाऱ्यांना आम्हाला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही कामातून त्यांना चोख उत्तर देऊ, असं केसरकर म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम