आजचे राशीभविष्य, शनिवार २९ ऑगस्ट २०२२

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑगस्ट २०२२ । मेष – गूढ गोष्टीं बद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून चांगले काम होतील. घरातील वस्तूंची खरेदी कराल. कोणताही व्यवहार जपून करावा. सासरच्या व्यक्तींकडून लाभ संभवतो.

वृषभ – मनाची चंचलता वाढू शकते. धार्मिक काम मध्ये मन रमवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मिळकतीत वाढ होण्याची शक्यता.

मिथुन – स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात वाढ करता येईल. कामाची योग्य पावती मिळेल. धन संचयात वाढ होईल.

कर्क – भावनात्मक विचार करू नका. चुकीच्या गोष्टींना खत-पाणी घालू नका. दिवस धावपळीत जाईल. कष्टाला पर्याय नाही.

सिंह – विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विरोधक नरमाईचे धोरण स्वीकारतील.

कन्या – मनातील इच्छा पूर्णत्वास न्याल. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. मित्रांची मदत घ्यावी लागेल. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.

तूळ – हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागावे. फक्त कामावर लक्ष केन्द्रित करा. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.

वृश्चिक – सरकारी कामे पुढे सरकतील. तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सहकार्‍यांकडून फार अपेक्षा बाळगू नका.

धनू – सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो. मैदानी खेळाची आवड निर्माण होईल. आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा.

मकर – मुलांची बाजू जाणून घ्या. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमची प्रगती इतरांच्या नजरेत खुपू शकते. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

कुंभ – भावंडांशी मतभेदाची शक्यता. नवीन संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल. वादाचे मुद्दे टाळावेत.

मीन- प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा. राजकीय क्षेत्रातून लाभ संभवतो. अति तिखट पदार्थ खाऊ नका. करमणुकीत जास्त वेळ घालवाल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम