त्रिमुर्ती फार्मसी महाविद्यालयामध्ये “गणेशोत्सव व फार्मसी डे” उत्साहात

बातमी शेअर करा...
बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३ |  पाळधी येथील नामांकित त्रिमूर्ति शिक्षण संस्थेत “गणेशोत्सव व फार्मसी डे” या कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. दहा दिवसच्या गणेशोत्सवमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी  त्रिमुर्तीचा राजा विराजमान झाले श्रींची स्थापना त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव नियोजन मंडळाचे सदस्य श्री. मनोज पाटील सरांच्या यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी श्रींची आरती त्रिमुर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुनिल पाटील सरांच्या हस्ते करण्यात आली. चौथ्या दिवशीच्या आरती धरणगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. उद्धव ढमाले यांच्या हस्ते करण्यात आली. सातव्या दिवशी श्रींची आरती श्री. भरतजी अमळकर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ सुकाणू समिति सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आली. तदनंतर “२५ सप्टेंबर जागतिक औषधनिर्मता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे” उद्घाटन श्री. भरतजी अमळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  अध्यक्ष श्री. मनोज पाटील सर उपस्थित होते व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने रक्तदान केले. नवव्या दिवशी श्रींची आरती जि. प. सदस्य श्री प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली तदनंतर जागतिक औषधनिर्मता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते शिबिरात रक्तदान करणारे व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र वाटप श्री प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अनंत चतुर्दशी च्या दिवशी श्रींची आरती अध्यक्ष श्री. मनोज पाटील सरांच्या यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. तदनंतर वाजत गाजत त्रिमुर्तीच्या राजाला निरोप देण्यात आला दहा दिवसाच्या गणेशोत्सवात प्राचार्य डॉ. अंकुर जैन, बी. एन. बाहेती सर, पॉलिटेक्निक प्राचार्य नागारे  सर, कार्यालयीन अधीक्षक श्री जुगल पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  गणेशोत्सव आयोजनासाठी प्रा. रोहित बावीस्कर, सुशिल भोसले, विशाल ठाकरे, आदित्य पाटील यांनी मेहनत घेतली.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम