जनतेच्या पैश्यावर मंत्र्यांचा दौरा : ठाकरे गटाची टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३

राज्यातील भाजप शिंदे सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत हे ब्रिटन दौरा ३ रोजी होणार असतांना आता त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ब्रिटनमध्ये होणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये कोणत्या कंपन्या येणार, कुणाला भेटणार, कुठली चर्चा होणार, नेमके कुठले करार होणार याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्योगमंत्री जनतेच्या पैशाने सुट्टीवर चाललेत का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.तसेच, दौऱ्याचा काहीच तपशील न देता उदय सामंत दौऱ्यावर गेले तर मी उदय सामंत यांच्या मतदारसंघात जाणार आणि जनतेच्या पैशाने चाललेली ही उधळपट्टी योग्य की अयोग्य याची विचारणा करणार, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.

आदित्य ठाकरे म्हणाले, 4 तारखेला होणाऱ्या आर्टिफिशीअल इटेलिजन्स कॉन्फरन्समध्येही उद्योगमंत्री सहभागी होणार आहेत. ते येथे जाऊन काय चर्चा करणार? माहिती नाही. जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या तयारीची पाहणी येत्या 5 तारखेला आपल्या राज्याचे उद्योगमंत्री करणार असल्याचे समजते. मात्र ते नेमकी कोणती पाहणी करणार? केवळ सुट्टी घालवण्यासाठी उद्योगमंत्री जात आहेत का?, असे सवाल आदित्य ठाकरेंनी केले.

आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योगमंत्र्यांचा दौरा रद्द झालाच पाहिजे, अन्यथा दौरा सुरू असतानाच आपण स्वतः उद्योगमंत्र्यांच्या रत्नागिरी मतदारसंघात जाऊन त्यांच्या मतदारांना हे योग्य की अयोग्य याची विचारणा करणा आहे. यानंतर उद्योगमंत्री म्युनिचला राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी जाणार असल्याचे समजते. उद्योगमंत्र्यांचा हा दौरा हास्यास्पद आहे. सरकारने खारघरसारख्या दुर्घटनेनंतर केलेल्या पाहणी दौऱ्यांचे नेमके काय झाले ते जाहीर करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम