आठवलेंच्या पक्षात गँगस्टरला एन्ट्री !

advt office
बातमी शेअर करा...

देशातील सर्वच पक्ष लोकसभेसाठी मोठी तयारी सुरु केली असून अनेकांचा पक्ष प्रवेश व आपली ताकद दाखविण्यासाठी सभेचे जंगी आयोजन करण्यात येत असून यासह पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या पक्षात गँगस्टरला एन्ट्री दिली आहे. गँगस्टर रामा गणिगा मांडवीकर उर्फ हरीश मांडवीकर याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याच्या प्रवेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत गँगस्टर हरीश मांडविकर याने आरपीआयमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश होताच रामदास आठवले यांनी त्याच्यावर मुंबई प्रदेश उपाध्यक्ष पदाची दिली जबाबदारी दिल्याची माहिती आहे. इतकंच नाही, तर हरीश मांडवीकर याचा कांदिवलीचे समाजसेवक असा उल्लेख करण्यात आला आहे.रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष सध्या एनडीएमधील घटकपक्ष आहे. अशातच आरपीआयमध्ये एका गँगस्टरने प्रवेश केल्यामुळे यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम