गौतमीला मोठा धक्का ; पोलिसांनी नाकारली परवानगी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० सप्टेंबर २०२३ | मंगळवारपासून राज्यात गणेशोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरूवात झाली असून गणेशोत्सवानिमीत्त राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, यादरम्यान ऐनगणेशोत्सवाच्या काळात पृसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कोल्हापूर पोलिसांनी बंदी घातली आहे. एसपी महेंद्र पंडित यांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली आहे.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, गौतमी पाटील यांचे जिल्ह्यातील करवीर आणि राधानगरी तालुक्यात कार्यक्रम होणार होते. त्या कार्यक्रमांना पाोलिसांनी परवानगी नाकारली आहे.त्यांनी सांगितले की, उत्सवाच्या काळात पोलिस दलावर बंदोबस्ताच्या कामाचा ताण असतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नयेत असे अवाहन दखील पंडिय यांनी केले.

गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रणाणात गर्दी होते. तसेच यापूर्वी देखील गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. तसेच राज्यात कुठेही गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार असेल तर कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते त्यामुळे कार्यक्रमस्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना काळजी घ्यावी लागते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापूर जिल्ह्यात परवानगी नाकारण्यात आली आहे. बंदोबस्ताचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम