गौतमीच्या चाहत्यांवर पोलीसांनी दिला दांडक्याचा प्रसाद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात अलेली नृत्यांगना गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आणि गोंधळ हे ठरलेलं समीकरण बनत चालंल आहे. गौतमीच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात देखील प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागल्याचे व्हिडीओ समोर आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गौतमी पाटीलच्या हा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी गौतमीच्या डान्स सुरू असताना जमलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरूवात केली. त्यामुळे या तरुणांना अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेत काही तरुणांनी डान्स सुरू असताना गौतमीवर पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला. यानंतर कार्यक्रम पंधरा मिनीटं हा शो बंद करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला पण तरुणांची हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. यानंतर पोलिसांनी जमलेल्या तरुणांवर लाठीचार्ज करत त्यांना कार्यक्रम स्थळावरून हुसकवून लावलं.

 

यावेळी तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे हा कार्यक्रम वेळेपूर्वीच आटोपता घ्यावा लागला. इतकेच नाही तर यानंतर देखील काही प्रेक्षकांनी गौतमी गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. अखेर बाउन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम