मनसेत पडली फुट ; उमेदवाराचा केला होता प्रचार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील पुणे येथील पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी डोक्यावर घेतल्याने राज्यात हि निवडणूक चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे मनसेला पुण्यात मोठी फुट पडली आहे. कसब्यात मविआच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केल्यामुळं मनसेनं सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती.

पुण्यात पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे.

भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची माहिती समोर आली.रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम अशी या सात जणांची नावं असून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम