गौतमीच्या कार्यक्रमाने आयोजकांचे टेन्शन वाढणार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ सप्टेंबर २०२३ |

राज्यात नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असलेली डान्सर गौतमी पाटील हि पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा नुकताच नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा डान्स चक्क एका शाळेच्या पटांगणात आयोजित केला गेला होता. आता शाळा देखील गौतमी पाटीलच्या डान्ससाठी बुक होणार का असा प्रश्न केला जात आहे?

तिसऱ्यांदा नाशिकमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी जिथे गौतमी डान्स करत होती ते मैदान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच होतं. दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजेचे मोठमोठे स्पीकर्स लावून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने तिच्या डान्सने परिसरातील तरुणांना वेड लावलं. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे.

गौतमीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नाच-गाण्याचा कार्यक्रम हा नेहमीच वादग्रस्त ठरतो. कधी तरुणांची दांडगाई, मारामाऱ्या तर कुठे गोंधळामुळे नेहमी चर्चेत असतो. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि नाशिक शहरात झालेल्या दोन्ही कार्यक्रम गोंधळ झाला. तसेच पत्रकारांना झालेल्या मारहाणीमुळे हा कार्यक्रम चांगल्याच चर्चेत आला होता. तर आता नाशिकमध्ये गौतमीच्या तिसऱ्या कार्यक्रमाच आयोजन चक्क विद्येच्या दारात केल्याने ते शांततेत झालं, ही या कार्यक्रमाची जमेची बाजू. गौतमी पाटीलने आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. गौतमी पाटीलने जरी या कार्यक्रमच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केलं असलं तरी आयोजकांचं टेन्शन वाढणार आहे. कारण शाळेच्या पटांगणात गौतमीचा क्रार्यक्रमात आयोजित केल्याने आयोजकांवर कारवाई होऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम