एक रुपयात मिळणार पिक विमा ; ‘हे’ कागदपत्रे आहे महत्वाची !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ ।  गेल्यावर्षी राज्यात शेतकऱ्यांचं अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकार अद्याप मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. पण शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. फक्त १ रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती तुम्हाला माहित आहे का ? त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांसाठी ही योजना लागू आहे ? हे सगळं तुम्हाला त्या अर्जात पाहायला मिळणार आहे. तो अर्ज भरताना काळजीपूर्वक माहिती भरा.

राज्यात एक रुपयात पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे गरजेची
) पीकपेरा स्वयं घोषणापत्र,
२) सातबारावर उतारा
३) आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक
४) सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र

तुम्ही तो अर्ज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, सुरुवातीला तुमचं नाव भरावं लागेल. त्यानंतर तुमचा पत्ता जो आधार कार्ड किंवा रेशनकार्डवरती असेल तो, त्यानंतर ८ अ उताऱ्याप्रमाणे तुमचं गाव, तुमच्या नावावर असलेलं एकूण क्षेत्र तिथं भरायचं आहे. अर्जात बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका ही पीक आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड नंबर, त्याच्या खाली बँकेचे नाव, शाखा…मोबाईल नंबर इत्यादी माहिती तुम्हाला अर्जात भरायची आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम