सरकारमधील दोन मंत्र्यांनी जीवे मारण्याची धमकी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी करीत अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये स्थापन झाले आहे. आता त्याच सरकारमधील दोन मंत्र्यांना धमकीचे फोन आले असून मोठी खंडणी सुद्धा मागण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

पहिला फोन मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला होता याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या गावाच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी देखील केली आहे.
राज्यात सत्ता संघर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना धमकी आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्येच सामील झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनाही धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात पाटील याने संपर्क साधला होता. त्याने भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याची धमकी दिली होती. भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याला धमकी देणारा दूरध्वनी करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. भुजबळ सोमवारी (१० जुलै ) पुण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम