
मी येतोय निवडणुकीसाठी सज्ज व्हा; संजय राऊत
दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ 103 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. कोठडीत राहिलेल्या संजय राऊत यांना मागील आठवड्यात जामीन मिळाला आहे तर राऊत यांचा वाढदिवसही नुकताच पार पडला आहे. या दरम्यान राज्यातील अनेक शिवसैनिकांनी संजय राऊत यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहे. नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांना भेटून पुष्पगुच्छ भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मात्र मी येतोय, निवडणुकीसाठी सज्ज व्हा अशा सूचना देत लवकरच नाशिक दौरा करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांना खरंतर पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली होती. तेव्हाही नाशिकचे पदाधिकारी राऊत यांच्या भेटीला गेले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी संजय राऊत आहेत, त्यामुळे नाशिकला संजय राऊत यांचे दौरे मोठ्या प्रमाणात होत असतात.ईडीने अटक करण्यापूर्वी देखील संजय राऊत यांचा नाशिकमध्ये दौरा झाला होता, त्यातनंतर आता जामीन झाल्यावर देखील संजय राऊत नाशिकचा दौरा करणार आहे.संजय राऊत यांच्या अटकेनंतर आणि त्यापूर्वी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर नाशिकमधील आमदार, खासदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत मात्र, पदाधिकारी मात्र अद्यापही ठाकरे यांच्याकडेच आहे.ठाकरे गटाच्या दृष्टीने नाशिक महत्वाचा विभाग आहे, विशेषतः शहरात देखील शिवसेनेची ताकद अधिक असून दोन आमदार आणि एक खासदार गेले असले तरी पदाधिकारी टिकून आहेत. याच जोरावर संजय राऊत आक्रमक होऊन आता नाशिक दौरा करणार आहे, लवकरच नाशिक दौरा करणार असून मी येतोय निवडणुकीसाठी सज्ज व्हा अशा सूचना राऊत यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम