
केद्रात शिंदे गटाला मिळणार मंत्रीपद ? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
राज्यात शिंदे गटाने भाजपशी जवळीक केल्यानंतर सत्ता स्थापन करून राज्यात शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस यांनी जबाबदारी बजावली आता केंद्रात देखील शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद असेल. गजाननं किर्तीकर आणि हेमंत पाटील या दोन खासदारांना ही मंत्रिपदं मिळतील अशी माहिती साम टिव्हीच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम