तुमचे आज आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल ; आजचे राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३

मेष  : कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात तर तुम्ही फायद्यात राहाल.

वृषभ : आर्थिक लाभ होतील. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. नवी भागीदारी आशाजनक असेल. जोडीदार तुम्हाला त्याची/तिची सुस्वभावी बाजू दाखवेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल दिवस.

मिथुन  : इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक बचत करा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमच्या प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा.

कर्क : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. कामाच्या ठिकामी मन लावून काम करा.

सिंह  : गुंतवणूक करणे श्रेयस्कर. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिस मध्ये लवकर सुट्टी होऊ शकते आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात.

कन्या : आर्थिक योजना यशस्वी होईल. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल. परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. कामामध्ये व्यस्त राहिल्याने कुटुंबाला वेळ देता येणार नाही.

तूळ  : आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. जोडीदाराकडून एक चांगली बातमी समजणार आहे.

वृश्चिक : आर्थिक लाभ होण्याची शक्यता. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे.

धनु  : सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. वेळ भरभर निघून जाते म्हणून, आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.

मकर : शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा.

कुंभ : आर्थिक स्थिती साधारण. कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

मीन : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम