ललित पाटील पुण्यात : न्यायालयाने घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ |  राज्यात गेल्या काही दिवसापासून गाजत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीमधील ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा मुंबईतील तपास पूर्ण झाल्याने त्याला अन्य गुन्ह्यांतील चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्याबाबत सोमवारी न्यायालयाने वॉरंट जारी केले. पुणे शहर पोलिसांच्या तपासामध्ये काही मोठे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई पोलिसांच्या पथकाने ललित याला चेन्नईमध्ये बेड्या ठोकल्या. साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात होता. तेथील तपास पूर्ण झाल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यामुळे शहर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने प्रोडक्शन वॉरंट मिळवले. त्याला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या २४ तासांत त्याचा ताबा पुणे शहर पोलिसांना मिळणार आहे. त्याचबरोबर त्याचे साथीदार शिवाजी शिंदे व राहुल पंडित या आरोपींचा ताबा मिळावा म्हणून पोलिसांनी अर्ज केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेली ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अरहाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम