रोटरी वेस्ट तर्फे राऊत विद्यालय वॉटर प्युरीफायर, सात पंखे भेट

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | 19 सप्टेंबर 2022 | जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयास विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरीफायर सिस्टीम एक हजार लिटर पाण्याच्या टाकीसह व वर्ग खोल्यांसाठी सात सिलिंग फॅन भेट देण्यात आले.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष संदीप काबरा, चंदूभाई सतरा, डॉ राजेश पाटील, केकल पटेल, अरुण नंदर्षी, योगेश भोळे, अध्यक्ष सुनिल सुखवाणी, सचिव विवेक काबरा, अखिल कोळी समाज परिषदेचे सहसचिव कमलेश सोनवणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे, पर्यवेक्षक एस एम रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर यांचेसह शिक्षक शिक्षकेत्तर व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

अध्यक्ष सुनिल सुखवाणी यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करण्यात आली असून दोन वर्ष याची वार्षीक देखभाल रोटरी वेस्ट तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन योगराज सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद कोळी यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम