या दिवशी मुलीना मिळणार मोफत इलेक्ट्रीक स्कुटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । देशात मुलीसाठी सरकार वेगवेगळ्या घोषना करीत आहे तर दुसरीकडे ८ मार्च जवळ येत असल्याने विविध कंपन्या किंवा राज्य सरकारकडून महिला दिनानिमित्त विविध घोषणा केल्या जातात. महिलांनी कुठे सवलती मिळतात तर कुठे काहीतरी मोफतही. यामुळेच 8 मार्च निमित्त कुठे काय ऑफर आहे, याचा शोध महिला व मुलींनी सुरु केला आहे. परंतु महिला दिनानिमित्त नाही तर एका सरकारी योजनेत मुलींना मोफत इलेक्ट्रीक स्कुटी देण्यात येणार आहे. राजस्थान सरकारने मुलींना मोफत स्कुटी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. या योजनेत ३० हजार विद्यार्थीनी पात्र ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व मुलींना आनंद झाला आहे.

राजस्थान सरकार काळीबाई भील योजनेत, १२वीत ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आणणाऱ्या मुलींना स्कुटी देणार आहे. यापूर्वी २० हजार स्कुटी वाटपाचे सरकारचे उद्दिष्ट होते. आता बजेटमध्ये त्याची संख्या 10 हजार वाढवून 30 हजार करण्यात आली आहे.

राजस्थान रोडवेजमध्ये महिलांचा प्रवास आता स्वस्त झाला आहे. बजेटमध्ये भाड्यात 50 टक्के सूट देण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट 30 टक्के होती. म्हणजेच पूर्वी महिलांना 70 टक्के भाडे भरावे लागत होते. आता ते निम्म्यावर आले आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या घरापासून कार्यालये आणि औद्योगिक भागात नेण्यासाठी महिला विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. हा सरकारचा चालू असलेला प्रकल्प आहे.

सरकारी शाळांमध्ये ट्रान्सपोर्ट व्हाउचर योजना सुरू होणार आहे. याअंतर्गत मुलांना घर ते शाळा आणि शाळा ते घर असा 75 किलोमीटरचा प्रवास मोफत करता येणार आहे. या योजनेचा अनेक मुले व मुलींना होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम