राऊतांनी घेतले भाजपला रडारवर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली. मात्र, या पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. मतदान सुरू होताच पिंपरी-गुरव येथील मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये प्रथम बाचाबाची व नंतर हाणामारी झाली. यावरुन संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच रडारवर घेतले आहे.

राऊत म्हणाले, आता निवडणूक सुरू झाली आहे. पुण्यात पुण्याच्या पद्धतीनेच मतदान होईल. आज रविवार आहे. त्यात पुणे आहे. पुणेकर एकदा उतरले तर मोठ्या रांगा दिसल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाळपर्यंत अधिकाधिक मतदार मतदान करतील. पुण्यातील लोक आरामशीर बाहेर पडतात. लोकांमध्ये उत्साह आहे. चिंचवड आणि कसब्यात मोठा उत्साह दिसला. त्यामुळे पुणेकर घऱी बसणार नाही. सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली तर यांच्या तोंडाला फेस येतो. सावरकर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतीकारक होते. महाराष्ट्राचे सुपूत्र आणि महान नेते होते. त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रेरणा घेतली.

संजय राऊत म्हणाले, लोकांना सावरकर फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी हवे आहेत. सावरकरांचा अपमान काही लोक करत असतात. त्याला उत्तर द्यायचे असेल तर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारने त्यांना भारतरत्न द्यावा. सावरकरांना भारतरत्न देऊन हिंदुत्ववादी असल्याचे सिद्ध करावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम