राज्यात नाही तर केद्रात मंत्री पद द्या ; आमदार संतोष बांगर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ । राज्यातील शिवसेना व भाजप युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या त्यानंतर त्यांना लागलीच अर्थमंत्री पद मिळाले तर आमदार संतोष बांगर यांनी आपल्या शिष्टमंडळाला घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.

हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार संतोष बांगर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे प्रभावित होऊन शिवसेना-भाजपाला पाठींबा दिला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात महाराष्ट्रातील शिवेसना-भाजप युती सरकारचा बोलबाला आहे. त्यामुळे अजित पवार युतीमध्ये सहभागी झाले आहेत. संतोष बांगर यांनी सांगितले की, आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिलेला आहे. त्याची पुर्तता होणारच आहे, असा विश्वास व्यक्त करत बांगर पुढे म्हणाले, केंद्रात किंवा राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद द्यावे, यासाठी आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत.

आमदार संतोष बांगर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते दिल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे शांत व संयमी होते. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाडसी नेतृत्व आहे. त्यांना सर्वसामान्य कार्यकर्ते व आमदारांच्या प्रश्‍नांची जाण आहे. त्यामुळे कोणत्याही आमदारांवर अन्याय होणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम