खुशखबर ! तब्बल ३० वर्षानंतर माहेरच्या साडीचा येणार दुसरा भाग !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ मार्च २०२३ ।  राज्यात प्रत्येकाच्या घरोघरी पोह्चलेला चित्रपट म्हणजे माहेरची साडी अगदी शहरापासून ते थेट ग्रामीण भागातील महिलांनी हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्या मराठी चित्रपटांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी केलेल्या अभिनयाचे प्रचंड कौतूक झाले होते. तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

झी मराठीच्या अवॉर्डच्या सोहळ्यात अलका कुबल यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.यावेळी त्यांना माहेरची साडी २ मध्ये आता त्या सासूच्या भूमिकेत सुनेचा छळ करताना दिसणार का असा मिश्किल प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी मला देखील या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे कळले आहे. अजुन त्याविषयी अधिक माहिती नाही. असे अलका यांनी सांगितले होते.

माहेरची साडी यामध्ये अलका कुबल यांनी सुनेची भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूकही झाले होते. मराठी प्रेक्षकांनी अलका कुबल यांची प्रशंसा केली होती. त्या चित्रपटानं अलकाजी घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण, जयश्री गडकर, भालचंद्र कुलकर्णी, जयराम कुलकर्णी, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव यांच्या भूमिका होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम