शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी : पाऊस फिरला माघारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ ऑक्टोबर २०२२ । राज्यात दिवाळीमध्ये परतीचा पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली होती. पंरतु शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही.

यावर्षी राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातली पिके सडून गेली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बसला आहे. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह देशभरातून नैऋत्य मॉन्सून परतला असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. आता मॉन्सूनचे पुढील अपडेट एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहेत.

परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झाल आहे. त्यामुळे त्याचा फटका ओडीशा आणि बंगाल या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम