जनतेला गुडन्यूज ; पेट्रोलसह डीझेलचे दर बघा झाले किती ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मार्च २०२३ । देशभर महागाई वाढत असतांना गुढीपाडव्याआधी एक गुडन्यूज आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल डिझेल देखील स्वस्त झालं आहे. वाढत्या महागाईत पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे गुढीपाडव्याला जर कुठे बाहेर जायचा प्लॅन असेल तर आजच टाकी फुल्ल करून घ्या. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून खाली उतरत असल्याचं दिसत आहे. ब्रेंट क्रूड डॉलर 73 च्या आसपास पोहोचले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून आला आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे पेट्रोल २४ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.७६ रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. डिझेल येथे २१ पैशांनी घसरून ८९.९३ रुपये प्रति लीटर मिळत आहे. आज एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीत नरमाई दिसून आली. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत.

दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसते.
पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला SMS द्वारेही मिळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्यासोबतच HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम