गुगलचा मोठा निर्णय : ही सुविधा करणार बंद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  जगभरातील अनेक लोक गुगलवर आपल्याला हवे ते शोधत असतात. त्यात कुठलीही माहिती लोकांना नियमित मिळत असते. आता Google द्वारे ‘अल्बम आर्काइव्ह फीचर’ बंद केले जात असून त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

19 जुलै 2023 पासून हे फीचर पूर्णपणे बंद करत आहे. तुम्ही Google अल्बम आर्काइव्ह फीचर वापरत असल्यास, तुमच्याकडे सुमारे एक महिना आहे. खरंतर Google अल्बम अर्काइव्ह फीचरचा वापर वेगवेगळ्या प्रोडक्टचे कंटेट पाहण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी केला जातो.

Google द्वारे नवीन सर्व्हिस बंद केल्याबद्दल यूझर्सला ईमेलद्वारे माहिती दिली जात आहे. त्यानुसार Google Album Archive 19 जुलै 2023 पासून उपलब्ध होणार नाही. म्हणजे Google अल्बम अर्काइव्हवर उपलब्ध डेटा 19 जुलैपासून हटवला जाईल. म्हणून, त्यापूर्वी तुम्ही Google Takeout वरून तुमचा डेटा डाउनलोड करू शकता.
Google यूझर्स ईमेलद्वारे त्यांचा डेटा डाउनलोड करू शकतात. यासोबतच गुगल ड्राईव्ह, आयड्राईव्ह, वन ड्राईव्ह वरूनही डेटा स्टोर केला जाऊ शकतो. याशिवाय, अल्बम आर्काइव्ह पेजच्या टॉपवर दिसेल, जो यूझर्सला 19 जुलै 2023 नंतर कंटेट काढून टाकण्याविषयी सूचित करेल. यूझर्स त्यांच्या Google अल्बम अर्काइव्ह फीचरचा कंटेंट इतर अनेक मार्गांनी मॅनेज करू शकतात. यामध्ये ब्लॉगर, Google अकाउंट, Google Photos आणि Hangouts यांचा समावेश आहे. अल्‍बम आर्काइव्‍ह फीचरमध्‍ये, तुम्‍हाला पहिलेच उपलब्ध अटॅचमेंट हँगआउट ट्रांझिक्शन म्हणून गूगल चॅटमध्ये मिळवता येऊ शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम