तीन रेल्वे गाड्यांची धडक ; १२ डबे रुळावरून घसरले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी तीन गाड्यांची धडक झाल्यानंतर 22 दिवसांतील हा दुसरा रेल्वे अपघात पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत १२ डबे रुळावरून घसरले. मात्र यामध्ये जीवित व वित्तहानी फारशी झाली नाही. या धडकेच्या जोरदार आवाजाने ओंडा रेल्वे स्थानकाच्या आसपासचे लोक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच मालगाडीच्या लोको पायलटला सुखरूप बाहेर काढले.

रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने आद्रा-खड़गपूर सेक्शनमधील रेल्वे वाहतूक सुमारे दोन तास प्रभावित झाली होती. घटनास्थळी पोहोचलेले दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय सुरक्षा अधिकारी दिवाकर माझी यांनी पत्रकारांना सांगितले- ओंडा रेल्वे स्थानकावर एक मालगाडी आधीच उभी होती. मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने धडक दिली. अखेर हा अपघात कसा झाला, हे तपासानंतरच कळेल. सिग्नल बिघाड झाला असावा.

अन्य एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, बांकुराहून विष्णुपूरला जाणारी एक मालगाडी ओंडा स्टेशनच्या लूप लाइनवर उभी होती. याच मार्गावर मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, मागील मालगाडीचे इंजिन समोरील मालगाडीवर चढले. दक्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनी सांगितले की, एक मालगाडी लूप लाइनमध्ये उभी होती आणि दुसरी ट्रेन सिग्नलवर थांबणार होती, पण ती रेड सिग्नलच्या पुढे गेली, ज्यामुळे हा अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. अपघातानंतर सकाळी 8.30 च्या सुमारास पहिली गाडी या मार्गावर धावली. आतापर्यंत 11 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम