चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | राज्यातील महामार्गावात पुन्हा एकदा अपघातात बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये सात- ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बस वरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील जखमी प्रवाशांवर सध्या मेहकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम