मराठा आंदोलकांनंतर आता धनगर समाज आक्रमक ; मंत्र्यांवर उधळला भंडारा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या १० दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असतानाच आता धनगर आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आता शिंदे व फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या अंगावर आंदोलकांनी थेट त्यांच्या अंगावरच भंडारा उधाळला आहे. सोलापूर दोऱ्यावर असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याची चर्चा करण्यासाठी गेलेल्या धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर दौऱ्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज आले होते. या दरम्यान धनगर समाजाच्या आंदोलकांनी त्यांची वेळ मागत त्यांना भेटण्याची विनंती केली. पोलिसांच्या मार्फतच राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलकांना भेटण्याची तयारी दाखवली. आंदोलक आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चा सुरू असतानाच एका आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे जवळील सुरक्षा रक्षकांनी त्या आंदोलकाला चांगलेच बदाडले.

धनगर समाजाचे कार्यकर्ते विखे पाटील यांना भेटण्यासाठी शांततेत विश्रामगृहामध्ये आले होते. त्यांच्याशी बोलण्यासाठी विखे पाटील उठून उभे राहिले आणि त्यांच्या मागण्यांची चौकशी केली. त्यावेळी धनगर समाजाचे आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. ते निवेदन वाचत असतानाच शेखर बंगाळे याने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्यासह येथे उपस्थित सर्वच गोंधळले होते. हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनीच त्याला सोडवण्यासाठी निर्देश दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम