सरकारचा निर्णय : तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज !
बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतांना यात तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. सरकारकडून काही घोषणा होईल आणि आपल्या हाताला नवीन काम मिळेल, या आशेवर देशातील तरुणवर्ग आहे. अशातच बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने सोमवारी अल्पसंख्याक तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे तरुणांना मोठा फायदा होणार आहे.
बिहार सरकारने ‘मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना’ मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार अल्पसंख्याक महिला किंवा पुरुषाला नवीन उद्योग उभारण्यासाठी १० लाख रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला ग्रीन सिग्नल देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्याच्या उद्योग विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला होता. या योजनेबाबत माहिती देताना बिहारचे अतिरिक्त मुख्य सचिव एस सिद्धार्थ म्हणाले, राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या आणि बेरोजगार अल्पसंख्याक महिला किंवा पुरुषांमध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार तरुणांसाठी ही MAUY योजना सुरू केली जाणार आहे. बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री SC-ST-EBC योजना, मुख्यमंत्री महिला उद्यमी योजना आणि मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या धर्तीवरच ही योजना सुरू केली जाणार आहे. सध्या या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयांना मंजुरीही देण्यात आल्याचं एस सिद्धार्थ यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाने बिहारमधील प्रमुख आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे वैद्यकीय चाचण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे रूग्णालयातील रूग्णांसाठी नोंदणी आणि खाटांचे शुल्क वगळता इतर सर्व काही उपचार मोफत असणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम