सोन्यासह चांदीचे दरात घसरण ; वाचा किती आहे भाव !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ सप्टेंबर २०२३ | देशात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणत सोन्यासह चांदीच्या दरात घसरण होत असतांना आता सोन्याचे भाव ६० हजारांपर्यंत पोहोचले होते. मे-जून महिन्यात सोन्याचे भाव अधिक वाढले होते तर सप्टेंबर महिन्यात पडझड पाहायला मिळाली.

आज सकाळच्या सत्रात सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पडझड पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्या किंमतीतही घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या भावात किचिंत घसरण झाली आहे. पाहूया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील. सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५१० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,१०० रुपये मोजावे लागले होते तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,८८० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २४ कॅरेटमध्ये २२० रुपयांनी घसरण झाली आहे.

सकाळच्या १० ग्रॅमसाठी ७५८ रुपये मोजावे लागले होते. तर आज १० ग्रॅम ७४८ रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या भावात प्रति किलोने १०० रुपयांनी घसरण झाली आहे. गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किंमत 59,730 आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर 59,730 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,760 रुपये मोजावे लागणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम