कांदा प्रश्नी सरकारचा मोठा निर्णय पण पवारांची मोठी प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून कांदा प्रश्न पेटल्याने राज्याच्या मंत्री धनंजय मुंडे यांनी आज थेट केद्रीय मंत्र्यांची भेट घेवून चर्चा केली आहे. त्यानंतर कांदा प्रश्नी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच या खरेदीसाठी नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्याया निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय आपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही. शरद पवार पुढे म्हणाले की, सध्याचा कांदा टिकणारा कांदा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहेत. म्हणूनच निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी पवारांनी यावेळी केली.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पियुष गोयल यांनी देखील कांदा खरेदीबद्दल माहिती दिली. गोयल म्हणाले की, पुढे देखील आणखी कांदा खरेदी करावा लागला तर खरेदी करू. मध्यप्रदेश, गुजरात येथे कांदा होतो तेथे देखील एनसीसीपएफ आणि नाफेड कांदा खरेदी करेल. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. या कांदा खरेदीचा दर आज निश्चित झालेला भाव २४१० रुपये प्रतिक्विंटल आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकार यावर नियंत्रण ठेवून आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार पुर्णतः तत्पर आहे असे पियुष गोयल म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम