अखेर अभिनेत्री राखीची आदिलने खोलली पोल !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑगस्ट २०२३ | गेल्या अनेक महिन्यापासून अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंत नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत येत होती. त्यानंतर ती तिच्या लग्नानंतर हि अनेकदा चर्चेत आली पण आता जरा वेगळ्या चर्चेत आली आहे. बऱ्याच दिवसांपासून तिच्या रिलेशशिपमुळे वाद सुरु होते. रितेशनंतर राखीने आदिलशी लग्न केलं आणि काही दिवसांतच राखीने आदिलवर खूप गंभीर आरोप केले यानंतर आदिलला तुरुंगात जाव लागलं. यानंतर नुकतंच त्याने पापाराझींसमोर येवून राखीचे सगळे पोल खोलणार असल्याचं सांगितल होतं. नुकतीच आदिलने प्रेस कॉन्फरन्स घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने तिच्यावर गंभीर आरोप केले. जे ऐकून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल.

आदिल दुर्राणीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एक पत्रकार परिषद दिली असून या मुलाखतीत त्याने राखीबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. राखीने अनेकदा मीडिया आणि पापाराझींसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे, मात्र आजपर्यंत आदिलची बाजू समोर आली नव्हती. अशा परिस्थितीत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने या मुलाखतीत अनेक गुपिते उघड केली आहेत, जी जाणून घेऊन राखीच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसू शकतो.

यावेळी बोलतना आदिलने सांगितलं की, व्हिडीओ कॉलवर दरम्यान राखीने त्याचे न्यूड व्हिडीओ शूट केले. राखीसोबत आदिल इतका खट्टू झाला आहे की, “अशा राखीसोबत महिलांशी बोलणंही खूप धोकादायक आहे.” आदिलने असंही सांगितलं की राखीने त्याला एक टॅब्लेट दिली होती ज्यामुळे तो नशेत होता. इतकंच नाही तर राखी मुंबईत होती आणि तो म्हैसूरमध्ये होता, यावेळी राखीने व्हिडिओ कॉलवर त्याचा न्यूड व्हिडिओही शूट केला होता. यासोबतच आदिलने या मुलाखतीत असंही सांगितलं की राखीने रितेशला घटस्फोट दिला नव्हता. वयातील अंतराबद्दल बोलताना आदिलने सांगितलं की राखी खरं तर त्याच्यापेक्षा १९ वर्षांनी मोठी आहे. “माझं तिच्यावर आणि तिच्या आईवर खूप प्रेम होतं आणि मला तिची आई खूप आवडायची. आईच्या कॅन्सरच्या नावावर राखी प्रत्येक व्यक्तीकडून पैसे लुटायची. दर महिन्याला एक ते दोन लाख रुपये घ्यायची.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम