राज्यपाल पुन्हा अडचणीत : म्हणाले मी राज्यपाल…
दै. बातमीदार । ९ डिसेंबर २०२२ । राज्यातील बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी अनेकदा राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका होत होती व त्यांच्याकडून तीच चूक पुन्हा पुन्हा होवू लागली आहे. आज हि त्यांच्या कडून एक मोठी चूक झाली ती म्हणजे पुणे येथील एका कार्यक्रमात.त्यांच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपाल पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित झाले होते.
त्यावेळी त्यांनी एक विधान केलं ते म्हणाले की, “मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, कोश्यारी यांनी असं वक्तव्य केलं. राज्यपाल यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरीच्या बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मागे एक महिला बसली होती.
त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे महिलेने राज्यपालांना दुसर्या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, “तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे” असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. तर पुढे म्हणाले “मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ” तुम्ही जसे बोलणार तसे मी करणार, तुम्ही बोला’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. या वक्तव्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला. मात्र राज्यापालंच हे वक्तव्य सुचक आहे. अशी चर्ची आता सुरू झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम