राज्यपालांनी माफी मागायला हवी ; शिंदे गटाचा खुलासा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाने जो उद्रेक होत आहे त्यावर आता पर्यत सत्ताधारी शिंदे गटाकडून पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. ‘छत्रपती शिवरायांचा अपमान महाराष्ट्राची भूमी सहन करणार नाही. यापूर्वीही राज्यपालांकडून वक्तव्य आले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागायला हवी होती. यावर त्यांचा खुलासा आला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या,” अशी प्रतिक्रिया शिंदे- भाजप सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते कोल्हापूर येथे बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, राज्यपालाबाबतचे निर्णय केंद्राकडे असतात. राज्यशासनाने त्यांची भूमिका केंद्राला कळवली आहे. कर्नाटकातील बोम्मई सरकारची वागणूक योग्य नाही परंतु आपण योग्य वागायला हवे. कारण सीमावाद सामोपचाराने मिटायला हवा. दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्रातून बाहेरून लोक आले असतील तर त्यांना 10 भाषांत आम्ही शिक्षण देतो. महाराष्ट्राचे सातबारा देवनागरीमध्ये आहे, पण कर्नाटकचे सातबारा कानडीमध्ये असतात ते वाचताही येत नाहीत. सीमाभागात अत्याचार झाले आहेत. तुम्ही गुन्हा केला म्हणून जेलमध्ये होते. एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात आंदोलन केले होते. त्यांनी चाळीस दिवस तुरुंग भोगला, कर्नाटकचे अत्याचार सहन केले. पैशाने माणसं विकत घेतली जात असते तर उद्योगपती नेते झाले असते. माणसं प्रेमाने जिंकता येतात. तुम्ही आमदारांना कधी भेटला नाहीत त्यांना घराबाहेर उभं केलं, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आम्ही जनतेशी वफादार आहोत. तुम्ही आम्हाला काय म्हणता हे महत्वाचे नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम