पक्षाने तसा आदेश द्यायल हवा…बेळगावात अभिवादन करू ; शहाजी बापू

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील शिवसेनेतून बंड करून शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला रवाना झाल्यानंतर राजकारणापेक्षा ज्या डायलॉगची चर्चा झाली ती म्हणजे ‘काय झाडी, काय डोंगर, सगळं एकदम ओकके मध्ये’ याची ते सांगोल्याचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील आणखी एका कारणाने चर्चेत आले आहेत.

शहाजी बापू पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. पक्षाने आदेश दिला तर मी थेट बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून येईन..फक्त पक्षाने तसा आदेश द्यायल हवा.. असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केलं आहे.

मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न पुन्हा समोर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रीत काही गावांवर आपला दावा सांगितला आहे. तर महाराष्ट्रातील अनेक गावांनीही कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान समन्वय समितीमार्फत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकात जाणार होते. परंतु मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. शहाजी बापू पाटील यांनीही यावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम