‘त्या’ विधानाबाबत राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र ; कारवाईची केली अपेक्षा !
दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ । राज्यातील नेते मंडळींनी केलेले वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी आता राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याने आता त्या मंत्र्यावर कारवाईची अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे गटात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
काय होते प्रकरण ?
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं होतं. अब्दुल सत्तार यांना पदावरून काढण्याची मागणी झाली होती. त्यांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखी पेटलं होतं.
या संदर्भात माहिती राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी दिली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच लक्ष्य असणार आहे. दरम्यान सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्राद्वारे निवेदन दिलं होतं. राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनाची राज्यपालांनी दखल घेतली असून त्यासंबधी पत्र पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी पाठवलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार? अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम