ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ.अविनाश जोशी,एम.डी. यांची नियुक्ती..

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे संपन्न झाली. बैठकीत ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमळनेर येथील प्रथितयश हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश जोशी,एम.डी. यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी केली. डॉ. अविनाश जोशी हे इंडियन मेडिकल असोसिएशन (शाखा-अमळनेर) तसेच नामांकित मराठी वाङमय मंडळ या संस्थांचे अध्यक्षपदी कार्यरत आहेत. अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या आयोजनात त्यांचा प्रमुख सहभाग असतो.
ही बैठक महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष विकास महाजन (जळगाव), यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीला ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जिल्हा सचिव अ‍ॅड. जास्वंदी भंडारी (भुसावळ), जिल्हा पदाधिकारी अशोक महाजन (रावेर), कैलास महाजन (एरंडोल), प्रा. डॉ. सुभाष किसन महाजन (अमळनेर), अ‍ॅड. कुंदन साळुंके (अमळनेर), स्रीरोग तज्ञ डॉ. विनोद कोतकर (चाळीसगाव), जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मेधा भांडारकर (अमळनेर), ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष प्राचार्य डॉ. रविंद्र माळी(अमळनेर), संजय झोपे (यावल), योगेश महाजन(चोपडा), योगेश भोकरे (चाळीसगाव), रोहित मगर(जळगाव), कैलास कोळी(मुक्ताईंनगर), गोपीचंद सुरवाडे (बोदवड), भूषण रतन महाजन (जळगाव), राजधर महाजन, नितीन ठक्कर, नितीन पाटील पंकज महाजन (एरंडोल), यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ.रविंद्र माळी यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. सुभाष महाजन यांनी मानले.
डॉ.अविनाश जोशी यांच्या या स्तुत्य निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जातआहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम