लिपिकाने केली २० हजाराची मागणी १० हजार घेताच एसीबीने घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ डिसेंबर २०२२ । जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दि ९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका कर्मचाऱ्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज शुक्रवारी दुपारी रंगेहात अटक केली. शशीकांत नारायण साळवे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज शुक्रावारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, लिपीक शशिकांत नारायण साळवे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने संबंधीत तक्रारदाराने याबाबतल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे ,पो.कॉ.राकेश दुसाने यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम