अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे नवीन वीज कनेक्शन साठी मिटरउपलब्ध करून देणे बाबत निवेदन

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी ) ९ जून २०२२रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर तर्फे माननीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित अमळनेर उपविभाग१ यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून त्यात अमळनेर येथील बरेच विज ग्राहकांनी नवीन वीज कनेक्शन साठी डिमांड नोट भरलेले आहेत परंतु दोन-तीन महिन्यानंतर सुद्धा त्यांना वीज जोडणी मीटर अभावी देण्यात आले नाही. आपणास विनंती की या डिमांड नोट भरलेल्या ग्राहकांना वीज मीटर त्वरित उपलब्ध करून द्यावे व ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करावे अशी मागणी यात करण्यात आलेली आहे.
तसेच शासकीय भेट अंतर्गत माननीय श्री मनोज पवार अतिरिक्त कार्यकारी अभियंता विभाग २ म.रा.वि.वि.कं.म ग्रामीण यांच्याशी ग्रामीण भागात होणारा विजेच्या तक्रारीबाबत व वीज बिल या संदर्भात साधक-बाधक चर्चा करण्यात आली व त्यांनी आपण ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करू असे त्यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी श्रीमती श्रुती सलामे सहाय्यक अभियंता गुणवंता नियंत्रण शहर विभाग यांच्याशी नवीन मीटर कनेक्शन बाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. याबाबतचे आपली मागणीची दखल घेऊन वरिष्ठांकडे पाठवू असे आश्वासन दिले.तसेच विज ग्राहकांनी गो ग्रीन अॅप चा वापर करून बिलात सूट घ्यावी अशी सूचना श्री वैभव देशमुख सहाय्यक अभियंता शहर कक्ष १ अमळनेर यांनी केली.
याप्रसंगी अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल, जिल्हा निरीक्षक मकसूद बोहरी, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख श्री सुनील वाघ, सेक्रेटरी सौ कपिला मुठे, जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख विजय शुक्ल उपस्थित होते. अशी माहिती सौ मेहराज बोहरी कळवितात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम