गोपीचंद पुना पाटील,महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ ऑगस्ट २०२२ । कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था, भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंची १०२ वी जयंती तथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०२ वी पुण्यतिथीनिमीत्त दोघा थोर विभुतींना विनम्र अभिवादन करुन विविध कार्यक्रम घेण्यात आले.

BJP add

सर्वप्रथम या दोन्ही कतृत्ववान थोर दिवंगत विभुतींच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य सुनिल पाटील यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकरांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे” या वचनाचा हवाला देत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव करुन दिली, लोकमान्य टिळकांबद्दलही सुंदर असे मत त्यांनी मनोगतातून व्यक्त केले. कार्यवाहक रघुनाथ पाटील यांनीही विद्यार्थ्यांना या दोन्हीही थोर व्यक्तीमत्वांकडून आपणास खुप काही शिकायला मिळत असल्याचे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या.

सदर कार्यक्रमात या थोर व्यक्तींच्या जीवनपटावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत १५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला, सदर स्पर्धेत कु. अमृता भाऊसाहेब पगारे हिने प्रथमस्थान तर कु.जयश्री देवेंद्र महाजन हिने द्वितीयस्थान प्राप्त केले.

वक्तृत्व स्पर्धेच्या पश्चात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा सुंदर असा कार्यक्रम देखील घेण्यात आला. प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रशांत पाटील यांनी केले तर आभार प्रा.मनोजकुमार पवार यांनी मानले, सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम