
दै . बातमीदार । १ ऑगस्ट २०२२ । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगांव येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महित्सवी वर्षानिमित्त महा. राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शाळेत वितरित करण्यात आलेल्या भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन यावेळी भारतीय सेनेत कार्यरत असलेले माजी सैनिक महेंद्र पाटील शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी ज्येष्ठ शिक्षिका सरला पाटील तसेच धनश्री फालक यांच्या हस्ते करण्यात आले.
मेजर महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना सैनिकांच्या जीवनकार्याची ओळख पटवून दिली आपणही अशी देशसेवा करण्यासाठी सदैव तत्पर असावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी केले. उपशिक्षक योगेश भालेराव यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील व्हिडीओ क्लिप पीपीटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवली .तर त्यांचा पोवाडा ही विद्यार्थ्यांना ऐकवला.इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धाही यावेळी पार पाडण्यात आली त्यात अनुश्री अनिल चौधरी प्रथम, भूमिका शाम गरुड द्वितीय तर प्रीती प्रकाश मराठे तृतीय क्रमांक मिळवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम