जामनेरात किराणा दुकानाला भीषण आग ; लाखोंचे नुकसान !

बातमी शेअर करा...

बातमीदार \ १६ नोव्हेबर २०२३

राज्यात दिवाळीचा उत्साह सुरु असतांना अनेक ठिकाणी अचानक आग लागल्याच्या घटना वाढत आहे. अशीच एक घटना जामनेर शहरातील श्रीराम मार्केट भागातील किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले. सुदैवाने यात कुठलीही जिवतहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील श्रीराम मार्केट भागात प्रल्हाद कुमावत यांचे किराणा मालाचे दुकान असुन अचानक दुकानात आग लागली. दि. १४ रोजी मंगळवारी हि घटना घडली आहे. आग शॉकसर्किट मुळे लागल्याचे बोलले जात आहे. दुकानातील संपूर्ण मालाने आगीचे स्वरूप धारण केल्याने सर्व वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. आपला जीव वाचावा यासाठी यांनी कामगारांनी दुकानाच्या बाहेर पडले.

किराणा दुकानाला आग लागल्याचे माहीत पडताच माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ जामनेर नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. मात्र तो पर्यंत या भिषण आगीत दुकानातील सुमारे लाखोंचा किराणा माल जळुन भस्मसात झाला. यांच्याकडे उपजीविका चालविण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम