10 वि पास गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीनचा सत्कार

बातमी शेअर करा...

१० वी पास गुणवंत विद्यार्थी कुटूंब व देशाचे भवितव्य
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील

अमळनेर ( प्रतिनिधी )अमळनेर येथिल प्रभाग क्रमांक १७ मधिल श्रीराम कॉलनी मित्र मंडळाकडून नुकत्याच निकाल लागलेल्या १० वी पास गुणवंत विध्यार्थी व विद्यार्थिनी सत्कार समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना *१० वी पास गुणवंत विद्यार्थी कुटूंब व देशाचे भवितव्य असल्याचे मत सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.*
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थनी सामजिक कार्यकर्ते श्री. दिलिप धोंडू ठाकूर होते. श्रीराम कॉलनी, शारदा कॉलनी, रामेश्वर कॉलनी, वडचौक, श्रीकृष्णपुरा व परिसरातील विध्यार्थी व विद्यार्थिनीच्या सत्कार पेढे भरवून व आईस्क्रीम देवून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील यांचे हस्ते करण्यात आला. सत्कार समारंभ कार्यक्रमास माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री. जगन्नाथ बडगुजर, श्री. प्रल्हाद आप्पा पाटिल, उपसरपंच श्री. राजेंद्र भिमराव पाटिल, भैय्या चौधरी, नरेंद्र महाजन, सुभाष देवरे, नाना पावले, गणेश सोनवणे, प्रवीण ठाकूर, पत्रकार अशोक पाटील, जगदीश सोनार, भटू सैदाने, हितेश बारी, पवन बारी, समाधान नाथबुवा, मुंडके बंधू यांचे सोबत परिसरातील पालकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम