गुर्जर समाज सेवा मंडळाचा आळंदी येथे मेळावा संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑगस्ट २०२२ । प्रतिनिधी (महेंद्र पाटील पुणे) । गुर्जर समाज सेवा मंडळ आळंदी (पुणे) यांच्या वतीने दि.२१ रविवार रोजी वार्षिक मेळावा आळंदी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. बापुसो गोपालजी चौधरी( जिल्हा परिषद सदस्य जळगांव) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. महेंद्र शंकरराव जाधव आणि श्री. एम. सी.पाटील, बेरोजगार सेवक महेंद्र पाटील, वरगव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळेस जळगांव जिल्ह्यातील फुफनगरी येथील रहिवाशी( सद्या पुण्यात) वास्तव्यास असलेले मा. महेंद्र जाधव यांच्या बद्दल सांगायचे म्हटल्यास त्यांची मॅनेजमेंट कन्सल्टंट ची कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या हिमतीवर कित्येक गोरगरिबांना मदतीचा हात दिलेला आहे, त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आपला समाज हा खुप कमी असून आता आपल्याला समाजातील गोरगरीब लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून त्यांना स्वतःची प्रगती कशी करता येईल तसेच मंडळाचे तसेच तरुण मंडळी यांना काहीही व कोणतीही मदत लागेल तर ते कोणत्याही गोष्टीचा संकोच न करता सर्व्यांना मदत करू असे सांगितले तसेच समाजातील अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू..

यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमला आजी व माजी अध्यक्ष उपस्थित होते. तसेच कार्यकारी मंडळ यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर व गुर्जर समाज बंधू व भगिनिंचे मनस्वी आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम