सावदा शहरात गुटखा खलेआम । प्रशासनाचे डोळ्यासमोर वाहतूक व विक्री

बातमी शेअर करा...

सावदासह परिसरात गेल्या अनेक वर्षा पासून प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाला यांची खुलेआम विक्री व वाहतूक होत असून विशेष म्हणजे हे सर्व पोलीस प्रशासन व अन्नऔषधे विभागासह विविध प्रशासनाचे डोळ्यासमोर अगदी निर्धोक होत आहे तर याबाबत हे सर्व शासकीय विभाग हे धुतराष्ट्रा प्रमाणे डोळ्यावर आर्थिकमोहरुपी पट्टी बांधून बसलेले दिसत आहे तर गुटखा माफिया मात्र आलेला माल चढ्या दराने विक्री करून लाखोंचा मलिदा खात आहे, प्रतिबंधित असलेला गुटखा सावदा शहरात सध्या 220 रु प्रति पँकेट किंवा त्यापेक्षा अधिक दराने विक्री होत असून यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल देखील होत आहे.

वास्तविक गेल्या अनेक वर्षा पासून गुटखा विक्री वर प्रतिबंध असतांना देखील याची विक्री होत आहे व तो खाल्याने अनेक जणांना असाध्य रोगांनी आपले प्राण गमवावे लागले आहेत ही वास्तुस्थिती असतांना देखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करणे म्हणजे एकप्रकारे या गुटखा विक्रीस खुलेआम सूट देण्यासारखे असून ज्यांनी यामुळे प्राण गमावले त्यांस हे सर्व संबंधित जबाबदार नाही का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

दरम्यान याबाबत अनेक वेळा वृत्तपत्र वा अर्ज याव्दारे अनेकांनी आवाज उठवले मात्र पोलीस विभागासह सर्वांनी फक्त किरकोळ कार्यवाही करत यामागील मुख्यसूत्रधार यास वेळोवेळी अभय दिल्याचे दिसून येत आहे यामुळेच या सर्व खेळातील गुटखा किंग इतका मुजोर झाला आहे की माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही अश्या तोऱ्यात हा वावरत असून यास सर्व यंत्रणा कारणीभूत असून त्याचे अभय असल्यानेच सदर गुटखा किंग खुलेआम हे बोलू शकतो व गुटखा विक्री देखील करू शकत आहे हे विशेष, काही वेळा यांचेवर कार्यवाही झाली तरी त्यातून तो सहीसलामत कसा सुटेल याकडेच जास्त भर या यंत्रणाचा असतो, सदर गुटखा किंग हा मध्यप्रदेश जवळ असल्याने तेथून गुटखा आणून येथे विकतो हे सर्वश्रुत आहे.

त्याची माल आण्याची कार्यपद्धती इतकेच काय माल कधी येणार कुठे उतरणार तेथून कसा वाटप होणार इत्यादी सर्व माहिती यंत्रणा कडे असतांना देखील कार्यवाही करण्यात कुचराई होते झाल्यास कार्यवाहीची भनक अगोदरच त्यास कशी लागते? किंवा किरकोळ कार्यवाही होऊन मुख्य सूत्रधार नाम निराळा राहतो, केस दाखल झाल्यास न्यायालयातून देखील तो कसा सहीसलामत सुटले याची देखील व्यवस्था अगोदरच करून ठेवण्यात येते इतकी काजळी त्याची घेण्यात येते मात्र याच गुटख्या मुळे सर्वसामान्य जनतेची घरे उद्धवस्त होत आहे तरुण पिढी बरदाद होत आहे यांचेशी यासर्वाना काहीही देणेघेणे नाही ? त्यामुळे आता सावदा वा जिल्हास्तरावरून मोठी कार्यवाही होऊन सदर गुटखा विक्री करणारा किंग व त्याची टोळी जेरबंद होईल ही अपेक्षा व्यर्थ दिसत असून आत यात थेट वरिष्ठ स्तरावरून कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त होत असून ती कधी होते ? का हे दृस्ट चक्र असेच सुरू राहते याकडे नागरिक आता डोळे लावून आहेत,

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम