शिक्षक मतदार संघ निवडणुकीमुळे जिल्ह्यातील मद्य विक्री दुकाने बंद ( कोरडा दिवस ) ठेवण्याचे आदेश

आदेशावर दोन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा उल्लेख

बातमी शेअर करा...

बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाकरिता जळगाव जिल्ह्यात मतदान होणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव यांच्यामार्फत काढले आहेत. तसेच सदरचा आदेश बघितला असता आदेशावर दोन जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे.

आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.१९ जून २०२४ काढलेला आदेश बघितला असता त्यात नमूद केले आहे की,भारत निवडणुक आयोगाने दि.२४ मे २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये मुंबई विभाग,कोकण विभाग या पदवीधर मतदारसंघाच्या व नाशिक विभाग,मुंबई विभाग या शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्हयात निवडणुकीचे मतदान दि.२६ जून २०२४ ( बुधवार ) रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत होणार असुन मतमोजणी दि. १ जुलै २०२४ (सोमवार) रोजी होणार आहे.

 

त्या अनुषंगाने सदर निवडणुक खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणुक कालावधीत मद्य विक्री करण्यास मनाई / कोरडा दिवस जाहीर करणे बाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये तरतुद करणेत आली आहे.महाराष्ट्र विदेशी मद्य ( रोखोने विक्री व नोंदवहया इ. ) चे नियम १९६९ चे नियम ९ ( अ ) ( २ ) ( C ) ( १ ), ( २ ) तसेच महाराष्ट्र देशी मद्य नियम १९७३ चे नियम २६ ( C ) ( १ ), ( २ ) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने ( ताडी झाडे छेदणे ) १९६८ चे नियम ५ (ओ) ( १ ),( २ ) टी.डी. १ अनुज्ञप्तीतील अ.क्र. ११ ( ३ ) अन्वये मद्य विक्री दुकाने असलेल्या निर्वाचन क्षेत्रात ज्या दिवशी स्थानिक प्राधीकरणाच्या सार्वत्रीक निवडणुका किंवा पोटनिवडणुका होत असलेल्या ठिकाणी मतदानाचा दिवस
मतदानाच्या अगोदरचा दिवस व मतमोजणीचा दिवस या दिवशी मद्य विक्री बंद ठेवण्याबाबत नमुद केलेले आहे.तरी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणुक २०२४ चा कार्यक्रम जाहीर करणेत आलेला असल्याने सदर मतदानाच्या दिवशी जळगांव जिल्हयात मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

दि. २४ जून २०२४ रोजी म्हणजे मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर सायंकाळी सहा वाजेपासून मद्य विक्री दुकाने बंद राहतील. दि.२५ जून २०२४ रोजी म्हणजे मतदानाच्या अगोदरच्या दिवशी संपूर्ण दिवस दुकाने बंद राहतील.दि.२६ जून २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मद्या विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

आदेशाची जळगाव जिल्ह्यातील सर्व संबंधित मद्य विक्री अबकारी अनुज्ञातीधारकांनी नोंद घ्यावी जे अनुज्ञातीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत किंवा सदर आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ ( १ ) ( सी ) नुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल असे सुद्धा जिल्हाधिकारी जळगाव यांनी नमूद केले आहे.

सदरचा आदेश प्रत्यक्ष बघितला असता ( आदेशाच्या प्रतवर ) आदेशाच्या सुरुवातीला महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी ( राज्य उत्पादन शुल्क, विभाग ) जळगाव यांचे कार्यालय स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा समोर जिल्हा पेठ जळगाव असे नमूद आहे.परंतु आदेशाच्या शेवटी आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव अशी स्वाक्षरी असल्याने एका जिल्हास्तरीय वरिष्ठ कार्यालयात आदेशाच्या प्रतीचा नमुना अशाच प्रकारे असतो का..? असा प्रश्न जळगाव जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांमध्ये उपस्थित केला जात असून आदेशावर प्रति म्हणून सर्व अबकारी ठोक व किरकोळ मध्ये विक्री अनुज्ञातीधारक जळगाव जिल्हा ( मार्फत ) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क जळगाव जिल्हा असे सुद्धा नमूद केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम